विविध ठेव योजना
ठेवीदारांनी ठेवी ठेवताना घ्यावयाची काळजी
सहकार आयुक्त व निबंधक, पुणे (नियामक मंडळ) यांचे परिपत्रक क्र. २९०२ दि. २६/०७/२०२३ नुसार पतसंस्थांमधील ठेविंचा व्याजदर १०% पर्यंतच असावा. परंतु काही पतसंस्था व मल्टीस्टेट १५% पर्यंत व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना आकर्षित करतात. अवास्तव व अव्यवहार्य योजनांमुळे पतसंस्था व मल्टीस्टेट चा व्यवहार कोलमडतो व परिणामी ठेवी परत मिळणे दुरापास्त होऊन ठेवीदार व त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होते.
आपल्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी ठेवीदारांनी ठेवी ठेवतांना अवास्तव व्याजदराच्या अमिषाला बळी ना पडता पतसंस्था व मल्टीस्टेट यांचे कर्ज वाटप, राखीव निधी, तरलता निधी, ऑडिट वर्ग, थकबाकी, एन.पी.ए., शाखा विस्तार, कर्मचारी भरती, मागील सलग तीन वर्षे लाभांश वाटप याचा अभ्यास करून सहकार कायद्यानुसार काम करणाऱ्या विश्वासार्ह पतसंस्थेची निवड करावी….
बचत ठेव योजना
दैनंदिन/ पिग्मी ठेव खाते
सुपर बचत ठेव खाते
रिकारींग ठेव योजना
बचत ठेव योजना
सभासदांच्या ठेवींचे सुरक्षित रक्षण व सातत्यपूर्ण वृद्धी करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे..!
पैशांची बचत ही केवळ सवय नसून सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा एक स्मार्ट निर्णय आहे.
बचत खाते तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि गरजेच्या वेळी सहज उपलब्ध करून देते. अनपेक्षित खर्चांसाठी आपण तयार आहोत, ही जाणीव मनाला दिलासा देते आणि आत्मविश्वास वाढवते. याच बचतीतून आपल्या स्वप्नांना आकार देण्याची ताकद मिळते.
बचत खात्याद्वारे तुम्हाला गरजेनुसार कधीही पैसे जमा करण्याचे किंवा काढण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते … मग वाट कसली पाहताय ?
आजच शालिवाहन पतसंस्थेत नवीन बचत खाते उघडा आणि उत्कृष्ट बँकिंग सेवा व तत्पर सुविधांचा अनुभव घ्या!
- खाते उघडण्यासाठी किमान शिल्लक रक्कम: रु. 200/-
• मोबाईल बँकिंग सुविधेशी संलग्न — तुमचे बँकिंग आता तुमच्या हातात
आपली बचत, आपला विश्वास — उज्ज्वल भविष्याची सुरुवात !
दैनंदिन/ पिग्मी ठेव खाते
दररोज पैसे येतात, पण महिन्याच्या शेवटी बचत होत नाही का ?
मग तुमच्यासाठी आहे खास शालिवाहन पतसंस्थेची….
दैनिक ठेव (पिग्मी) योजना…!
या योजनेत आमचा अधिकृत पिग्मी प्रतिनिधी दररोज तुमच्याकडे येऊन तुमच्या सोयीनुसार रक्कम घेवून जातो आणि ती रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते.
आजची छोटी बचत काही वर्षानंतर आकर्षक व्याजासह मोठी रक्कम बनते आणि तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करते.
ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे – गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, दुकानदार आणि लघु व्यापारी.
छोट्या छोट्या बचतीतून मोठी स्वप्ने पूर्ण करा…!
सुपर सेव्हिंग खाते – तुमच्या दैनंदिन आर्थिक गरजांसाठी स्मार्ट पर्याय!
शालिवाहन पतसंस्थेचे सुपर सेव्हिंग खाते हे दैनंदिन व्यवहारांसाठी खास तयार करण्यात आलेले आधुनिक व सोयीस्कर खाते आहे. या खात्यावर आकर्षक मासिक ५% द.सा.द.शे. व्याजदर प्रदान करणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था म्हणजे शालिवाहन पतसंस्था होय !
हे खाते विशेषतः वकील, डॉक्टर आणि व्यावसायिकांसाठी उपयुक्त असून, नियमित पेमेंट्स आणि त्वरित निधीची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक तरलता (Liquidity) उपलब्ध करून देते.
✔️ खाते उघडण्यासाठी किमान शिल्लक रक्कम: रु. ५००/-
✔️ मोबाइल बँकिंग सुविधेशी संलग्न – कुठेही, कधीही व्यवहाराची सोय
✔️ आकर्षक मासिक व्याजदरामुळे बचतीत सातत्याने वाढ
स्मार्ट सेव्हिंग, सुरक्षित भविष्य – शालिवाहन पतसंस्थेसोबत !
एस आय पी (आवर्ती ) ठेव योजना
“अर्थ संचायातून भविष्य निर्मिती ”
अनेक वेळा घरातील उत्पन्न दैनंदिन गरजांमध्ये खर्च होतं आणि गरजेच्या वेळी बचत अपुरी पडते. त्यामुळे शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध बचत करणे अत्यंत आवश्यक ठरते — आणि यासाठी एस.आय.पी. [आवर्ती ठेव] योजना हा एक उत्तम पर्याय आहे.
शालिवाहन पतसंस्थेची आवर्ती ठेव योजना तुम्हाला दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ठराविक रक्कम नियमितपणे जमा करण्याची सुविधा देते. या सवयीमुळे बचत सहजपणे वाढत जाते आणि ठराविक कालावधीनंतर आकर्षक व्याजासह एकरकमी रक्कम मिळते.
ही योजना विशेषतः भविष्यातील मोठ्या गरजा, स्वप्नं आणि आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
✔ नियमित आणि सोपी बचत ✔ ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर परतावा
✔ आकर्षक व्याजदर ९.५०%
छोटी बचत – मोठं भविष्य!
शालिवाहन पतसंस्थेसोबत सुरक्षित आणि नियोजित गुंतवणूक.
दामदुप्पट ठेव योजना
मोठी स्वप्नं… त्यासाठी हवी ठोस आर्थिक तयारी !
आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्मार्ट निर्णय घ्या…
आपली गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी करून ती दुप्पट व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.यासाठी शालिवाहन पतसंस्थेची “दाम दुप्पट ठेव योजना” हा एक विश्वासार्ह पर्याय आहे.
या योजनेअंतर्गत, केवळ १२० महिन्यांत तुमची गुंतवणूक होते दुप्पट —
तुमच्या स्वप्नांना मिळते गती ! म्हणजेच ही योजना, तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाऊल ठरू शकते.
✔ सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक ✔ निश्चित कालावधीत दुप्पट परतावा
✔ दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी उत्तम पर्याय
आजच निर्णय घ्या … आजच गुंतवणूक करा … आपल्या स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल उचला …
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा!
स्मार्ट गुंतवणूक – सुरक्षित भविष्य
व्यवसाय असो किंवा नोकरी — उत्पन्न येतं, पण ते टिकवणं आणि वाढवणं हीच खरी कला आहे. अनेकदा पैसे हातात येतात, पण नकळत खर्च होत जातात आणि बचत हळूहळू कमी होत जाते. म्हणूनच कष्टाने साठवलेला प्रत्येक रुपया योग्य नियोजनाने आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
यासाठी मुदत ठेव (Fixed Deposit) हा एक विश्वासार्ह आणि स्थिर पर्याय आहे. या योजनेत ठराविक रक्कम निश्चित कालावधीसाठी गुंतवली जाते आणि त्यावर निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीवर निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न मिळण्याची खात्री मिळते. विविध कालावधी आणि व्याज परतफेडीच्या पर्यायांमुळे ही योजना प्रत्येकाच्या गरजेनुसार लवचिक ठरते.
शालिवाहन पतसंस्थेची “मुदत ठेव योजना” म्हणजे ……
सुरक्षिततेची खात्री, स्थिर परतावा आणि आर्थिक प्रगतीची हमी.
सुरक्षित गुंतवणुकीद्वारे आपल्या पैशात वाढ करा … तेही वेळेत
मासिक (पेन्शन) ठेव खाते
आजची स्मार्ट गुंतवणूक– उद्याचं मोठं आधार बनते.
थेंबे थेंबे तळे साचते… जसे आज लावलेले झाड उद्या सावली व फळ देतं.
तसंच, आज केलेली शिस्तबद्ध गुंतवणूक उद्याच्या सुरक्षित आणि निश्चिंत जीवनाची हमी ठरते.
आपल्या भविष्यासाठी आजच योग्य नियोजन करा. याच विचाराने शालिवाहन पतसंस्था सादर करत आहे — मासिक (पेन्शन) ठेव योजना
दरमहा थोडी-थोडी रक्कम गुंतवत राहा आणि हळूहळू तयार करा एक मजबूत आर्थिक आधार. या योजनेद्वारे मिळणारा परतावा दरमहा थेट आपल्या खात्यात जमा होतो, ज्यामुळे निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्नाची खात्री मिळते.
जीवनाच्या एका टप्प्यानंतर जबाबदाऱ्या कमी होतात, पण आर्थिक स्थैर्य अधिक महत्त्वाचं ठरतं. त्या काळात कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय शांत, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आजच योग्य पाऊल उचला.
निवृत्तीनंतर जगा — आनंदी, समाधानी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जीवन …!
If need any info About Deposit please contact us!
Inquiry Form
Error: Contact form not found.
Saving Account
A Business Friend Loan is an informal loan agreement between friends, where one lends money to the other to support a business venture. This type of loan typically has flexible terms, such as low or no interest, extended repayment periods, and minimal or no formal documentation. While it’s rooted in trust and goodwill, it’s important to establish clear repayment terms to avoid potential strain on the friendship.

