आमच्याबद्दल ………….!
” सहकारातून समृद्धिकडे “ वाटचाल करणारी पैठणची – शालिवाहन पतसंस्था
९ ऑक्टोबर १९९७ रोजी श्री संत एकनाथ महाराज यांचे पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण नगरीत ‘शालिवाहन’ नावाचे एक छोटेसे बीज रोवले गेले. २९ व्या वर्षात पदार्पण करताना “शालिवाहन पतसंस्था” आज एक भव्य असे वटवृक्ष बनली आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला सावकारी विळख्यातून बाहेर काढावे तसेच तळागाळातील जनतेचे आर्थिक जीवनमान उंचावे या उद्देशाने सहकार भारतीच्या कार्याने प्रेरित होऊन ९ ऑक्टोबर १९९७ रोजी शालिवाहन पतसंस्थेची मुहुर्तमेढ रोवली गेली.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या शालिवाहन पतसंस्थेचे पैठण येथे मुख्य कार्यालय सोबत १३ शाखेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे १०,००० सभासद व ५०,००० + ग्राहकांचा समाधानी व विशाल परिवार सोबत आहे. शालिवाहन पतसंस्था सर्वोत्कृष्ठ बँकिंग बरोबरच महाराष्ट्रात विविध समाजोपयोगी सेवा देण्यातही अग्रेसर आहे.
सहकार भारतीच्या तत्त्वानुसार ” सहकारातून समृद्धि कडे “ म्हणजे सहकारात काम करत असतांना समाजासाठी खूप मोठे काम उभे करता येते हे शालिवाहन पतसंस्थेने सिद्ध केले आहे. समर्पित भावनेने काम करणारे उच्चशिक्षित संचालक मंडळ, कर्मचार्यांची भक्कम साथ आणि फक्त नि फक्त सभासद व ग्राहकांचे हित या आधारे बँकिंगची उत्कृष्ठ परंपरा आणि विश्वासाला विकासाचा मजबूत आधार देत शालिवाहन पतसंस्था आज महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी एक “रोल–मॉडेल” ठरली आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.
दृष्टिक्षेप एक इतिहासाकडे……
!! उत्तरो हिमवंतो राया ! दक्षिणो सलाहना !!
!! समभार भरक्रांता ! तेण पल्हहा सहनपूर्वी !!
(पूर्वेला सूर्य आहे, पश्चिमेला चंद्र, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राजकुल म्हणून ही पृथ्वी समभार आहे.)
ऐतिहासिक काळात “ प्रतिष्ठाण ” या नावाने ओळखले जाणारे सातवाहन राजवंशाचे आणि गौतमीपुत्र शालिवाहन राजाचे राजधानीचे ठिकाण असणारे , इतिहास व संस्कृतीच्या पाऊलखुणा जतन करणारे , श्री संत एकनाथ महाराजांच्या पावन समाधीने पुनीत झालेले दक्षिण काशी म्हणून स्थान असणारे आपले “ पैठण ” शहर होय .
शालिवाहन हा एक शूर व पराक्रमी राजा होऊन गेला. बालपणी तो एक वृद्ध कुंभाराच्या संपर्कात आला व त्याने तेथेच सुंदर-सुंदर मातीच्या मूर्ति घडविण्याची कला अवगत केली. शतकर्णी ( शालिवाहन ) आपल्या सवंगड्यांसोबत खेळतांना अनेक मातीचे हत्ती ,घोडे ,सैन्य, शस्त्र अशी खेळणी स्वत: तयार करून खेळत असे. जणू काही शालिवाहन राजाला भविष्यातील येणार्या संकटाची चाहूल लागली असावी आणि घडलेही असेच.
अशी एक अख्यायिका आहे की, राजा विक्रमादित्याने प्रतिष्ठाण (पैठण) नगरीवर आक्रमण केले असता शालिवाहनाने कुंभारवाडयातील तयार करून ठेवलेल्या हजारो बालपणींच्या खेळण्यांवर अभिमंत्रित जल शिंपडताच कोटींच्या संख्येमध्ये शस्त्रधारी सैन्य व इतर प्राणी जीवंत होऊन विक्रमादित्या विरुद्ध लढले. विक्रमादित्याचा दारुण पराभव करत त्याला ठार मारले व पुढे अनेक वर्षे उज्जैनवर राज्य केले . तो ४०० वर्षाचा सुवर्णकाळ हा अत्यंत वैभवशाली वा समृद्ध काल होता. शालिवाहनाने आपल्या जीवन काळात अनेक अत्याचारी शकांचा व यवनांचा पराभव केला आणि आपल्या विजयोत्सवाच्या रुपाने नवीन युगाचा म्हणजे शालिवाहन शकाचा प्रारंभ ई.स. पूर्व ७८ मध्ये केला . तेव्हापासूनच “ शालिवाहन शक ” ही कालगणनेची लोकप्रिय व प्रचलित पद्धत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश (द.भारत) मध्ये अस्तित्वात आली. हिंदू कॅलेंडर, हिंदू पंचांग, भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि कम्बोडिया बौद्ध कॅलेंडरमध्ये आज देखील शालिवाहन शकाचा प्रयोग केला जातो .
आज आपण शालिवाहन शके १९४८ मध्ये वावरत असतांना शालिवाहन प्रतिष्ठाण (पैठण) नगरीच्या पावन भूमीत शालिवाहनाच्या नावाने “शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था” उदयास आली व आज २९ व्या वर्षात पदार्पण करत महाराष्ट्रभर उंच उंच गरुडझेप घेतली आहे याचा संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार ,हितचिंतक यांना सार्थ अभिमान वाटतो
शालिवाहन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम का आहे ?

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मुख्य कार्यालय (पैठण) +13 शाखांचे भव्य जाळे व नियोजित 4 शाखा.

२९+ वर्षापासून पतसंस्थेच्या माध्यमातून विश्वसनीय व अविरत सेवा.

सातत्याने 98% कर्ज वसुली व नियमित ऑडीट वर्ग 'अ' (NPA Below 1%)

५०,०००+ आनंदी व समाधानी ग्राहक

१०,०००+ सभासदांचा समाधानी व विशाल परिवार

सातत्याने 12% लाभांश

ISO 9001-2015 मानांकन असलेली राज्यातील प्रथम पतसंस्था.

150+ प्रशिक्षीत व विनयशील कर्मचारी सदैव आपल्या सेवेत तत्पर

